ठरलं! उद्धव ठाकरे येणार नाहीत, ७ नोव्हेंबरला आदित्य ठाकरे मेहकरात घेणार सभा..

 
thakre
मेहकर(अनिल मंजुळजर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  आपण लवकरच मेहकरात येऊन सभा घेऊ असा शब्द उद्धव ठाकरेंनी बुलडाणा जिल्ह्यातील शिवसैनिकांना दिला होता. मात्र आता  उद्धव ठाकरे मेहकरात येणार नसून त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे येत्या ७ नोव्हेंबरला जिल्ह्यात येणार आहेत. त्यातही  खास मेहकरात ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

 खासदार प्रतापराव जाधव , आमदार संजय गायकवाड आणि आमदार संजय रायमुलकर हे तिन्ही लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. मात्र असे असले तरी शिवसेनेतून काँग्रेस आणि काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत परतलेले नरेंद्र खेडेकर यांच्यावर आता जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेची जबाबदारी देण्यात आली आहे. खेडेकरांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी मेळावे घेऊन खा. जाधव यांच्यासह आमदार गायकवाड व रायमुलकर यांच्यावर  आरोप केले आहेत. अशातच आता थेट आदित्य ठाकरे जिल्ह्यात येणार असल्याने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.