केळवद मध्ये हिंदु मुस्लिम एकोप्याचे दर्शन; ईदच्या दिवशी हिंदु बाधवांकडून मशिदीला भोंगा भेट..

 
rgh
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  राज्यभरात भोंग्यावरून राजकारण पेटलेले असतांना चिखली तालुक्यातील केळवद ग्रामस्थांनी हिंदु  मुस्लिम एकोप्याचे अनोखे दर्शन घडवले. ईदच्या दिवशी हिंदु बांधवांनी   मुस्लिम बांधवांना भोंगा भेट दिला. 

पाच हजार लोकसंख्या असलेल्या केळवद गावात एकूण लोकसंख्येच्या केवळ तीन टक्के  मुस्लिम बांधवांची संख्या आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही गावात गुण्यागोविंदाने राहतो..एकमेकांविषयी कधीही द्वेष निर्माण केला नाही . गावात सर्वधर्मसमभावाचे वातावरण असून त्यात कधीही तेढ निर्माण होऊ देणार नसल्याचे गावकरी सांगता

 राज्यात सध्या भोंग्यांच्या मुद्यावरून सुरू असलेले राजकारण द्वेषाचे आहे. द्वेषाचे राजकारण पेरून देशाचे कल्याण होणार नाही. राजकीय स्वार्थासाठी हा सगळा खेळ सुरू असल्याच्या भावना यावेळी गावकऱ्यांनी बोलून दाखवल्या.