चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार! कामे न करताच नकली बिले सादर करून पैसे उकळले! तरुणाचा आरोप, चौकशीसाठी उपोषणाला बसलाय..!

 
hgch
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तरुणाने केलाय. विकास कामे न करता नकली बिले सादर करून पैसे उकळण्यात आल्याचे तरुणाचे म्हणणे असून या प्रकाराची चौकशी व्हावी म्हणून तो आज,२३ सप्टेंबर पासून  ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसला आहे. 

विठ्ठल प्रकाश ठेंग असे उपोषणाला बसलेल्या तरुणाचे नाव आहे. गावच्या विकासासाठी आलेला निधी हा कामे न करता नकली बिले सादर करून हडपण्यात आल्याचा आरोप तरुणाने केलाय. अंगणवाडी साहित्य, अपंगांचा निधी, जिल्हा परिषद शाळेतील शौचालय, ग्रामपंचायत मधील पडीत भंगार, ग्रामपंचायत साहित्य खरेदी आदी कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विठ्ठल ठेंग यांनी केलाय.  

ग्रामपंचायत च्या पास बुक मध्ये एंट्री न करताच रक्कम गायब झाल्याचे त्यांचे म्हणून असून याआधी त्यांनी गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र निवेदनाची दखल न घेण्यात आल्याने आजपासून तरुणाने आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.