एल्गार मोर्चाला काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंनी दिले समर्थन; शेतकऱ्यांना म्हणाले मोठ्या संख्येने सहभागी व्हा; हजारो शेतकरी बुलडाण्याकडे निघाले..

 
bondre
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आज, ६ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता भव्य एल्गार मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने शेतकरी बुलडाण्याकडे यायला निघाले असून या मोर्चाला चिक्कार गर्दी जमणार आहे. दरम्यान या मोर्चाला सर्वच स्थरांतून पाठिंबा मिळत असून काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनीही या मोर्चाला समर्थन दिले आहे.

पक्षाच्या झेंड्यांना बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एकत्र येण्याचे आवाहन तुपकरांनी केले होते. या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सोयाबीन आणि कापसाच्या भाववाढीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण या मोर्चाला समर्थन देत असल्याचे राहुल बोंद्रे यांनी स्पष्ट केले असून शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.