रामदेव बाबांच्या विरोधात डोणगाव पोलीस ठाण्यात तक्रार! माजी राज्यमंत्री सुबोध सावजी म्हणाले ,कारवाई करा

 
baba
मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): योगगुरू रामदेव बाबा यांनी महीलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान  डोणगाव पोलीस ठाण्यात माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी तक्रार दिली असून रामदेव बाबांविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.

ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या एका शिबिरात २५ नोव्हेंबरला रामदेव बाबांनी महीलांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. हा कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणावर आयोजित करण्यात आला होता. रामदेव बाबांच्या विधानामुळे महिलांचा अपमान झालेला आहे, हा गुन्हा असल्याने त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी सावजी यांनी केली आहे.