सिंदखेडाजा तालुक्यातील पिंपळगाव सोनारा गावचे नागरिक झालेत भयभीत! त्यांना जे दिसल भीतीदायकच..!!
Sep 5, 2022, 14:47 IST

सिंदखेडराजा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळगाव सोनारा गावचे नागरिक अन शेतकरी सध्या चांगलेच भयभीत झाले आहे. दोन दिवसांपूर्वी मलकापूर पांग्रा, केशव शिवणी परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते . आता पिंपळगाव सोनारा शिवारात सुद्धा बिबट्याचे ठसे दिसून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सध्या शेतात सोयाबीन असल्याने शेतकऱ्यांचा बहुतांश वेळ शेतात जातो. मात्र अशातच आता बिबट्या चे ठसे दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये तसेच पशुपालक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मलकापूर पांग्रा परिसरात ज्या बिबट्याचा वावर दिसून आला त्याच बिबट्याचा हा वावर आहे की अन्य आणखी दुसरा बिबट्या या परिसरात आहे याबद्दल तर्कवितर्क वर्तविल्या जात आहे.
वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना भयमुक्त करावे अशी मागणी सरपंच तोताराम ठोसरे, नारायण ठोसरे, दिलीप ठोसरे, दत्तात्रय ठोसरे, नितीन पंजरकर, शिवशंकर ठोसरे यांनी केली आहे.