कार उलटली; ध्वजारोहणासाठी जात असलेले तलाठी गंभीर ! सिंदखेडराजा तालुक्यातील घटना

 
ghf
मलकापूर पांग्रा (अमोल साळवे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी जात असलेल्या तलाठ्याची कार उलटल्याने तलाठी गंभीर जखमी झाले. आज, १ मे रोजी सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जन ते आंबेवाडी दरम्यान असलेल्या पावर हाऊस जवळील उताराजवळ सकाळी ७ वाजता ही घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार साखरखेर्डा येथील रहिवासी असलेले शिवानंद इश्वरआप्पा वाकदकर (३५) हे त्यांच्या कारने डोरवी येथे ध्वजाररोहणासाठी जात होते.  रस्त्याचे काम सुरू असल्याने रत्यावर चुरी टाकण्याचे काम सुरू आहे . त्यामुळे रस्त्यावर अनेक गाड्या घसरत आहे. वाकदकर यांची कार उलटल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांचे सहकारी पंकज देशमुख, श्रीकृष्ण निकम , मदन वायाळ ,आनंद राजपूत यांनी त्यांना तातडीने चिखली येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.