सीओ गणेश पांडे यांनी स्वीकारला 'डीपीओ' पदाचा प्रभार ! आता 13 पालिका - नगरपंचायतच्या संनियंत्रणाची जवाबदारी

 
gfjygj
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून अल्पावधीतच आपल्या कार्याची छाप  पाडणारे गणेश पांडे यांनी आज 15 जुलैला जिल्हा प्रशासन अधिकारी पदाचा प्रभार स्वीकारला. आता जिल्ह्यातील 11 पालिका व 2 नगरपंचायत त्यांच्या  संनियंत्रणखाली राहतील. 

नगर पालिका प्रशासन मधील हे महत्वाचे पद समजले जाते.  विभागातील अभ्यासू व परिश्रमी अधिकारी म्हणून गणेश पांडे यांनी ओळख निर्माण केली आहे. सुमारे 1 वर्षा पूर्वी त्यांनी बुलडाणा पालिकेच्या मुख्याधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली आहे. यापूर्वी त्यांनी रिसोड( जिल्हा वाशीम) पालिका मुख्याधिकारी म्हणून काम केले आहे. सर्व पालिकाना समान न्याय देऊन पारदर्शी कारभाराला आपण प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी डीपीओ पदाचा प्रभार स्वीकारल्यावर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.