बुलढाणेकरांना मिळणार जमीन व मालमत्ता क्षेत्रातील सर्व सुविधा एकाच छताखाली! "अभिता" कंपनीच्या बुलढाणा शाखेचे उद्घाटन! कंपनी शेतकऱ्यांच्या पाठीशी; सीईओ सुनील शेळेकेंचा शब्द

 
fty
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हावासियांना आता जमीन व मालमत्ता क्षेत्रातील सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. जमीन व मालमत्ता क्षेत्रातील सर्व प्रकारच्या सेवा एकाच छताखाली व १०० टक्के ऑनलाईन पुरवणाऱ्या राज्यातील एकमेव  "अभिता" या कंपनीच्या बुलढाणा शाखेचा उद्घाटन सोहळा बुलढाणा शहरातील  चिखली रोडवरील सेठी कॉम्प्लेक्स मध्ये नुकताच पार पडला. अभिता कंपनी शेतकऱ्यांच्या पाठीशी  आहे . राज्यात मुंबई, रत्नागिरी, नाशिक ,अमरावती येथे कंपनीला ग्राहकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आता बुलढाणा शाखेच्या माध्यमातून जिल्हा वासियांना दर्जेदार सेवा पुरवणार असल्याचा शब्द कंपनीचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील शेळके यांनी यावेळी दिला.

 राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके व सौ . शंकुतला शेळके यांच्या हस्ते फीत कापून कंपनीचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांना मालमत्ता आणि यंत्रसामग्री मूल्यांकन, मालमत्ता आणि सर्व प्रकारचे विमा, ड्रोन द्वारे अचूक जमीन मोजणी, उत्तराधिकारी आणि तात्काळ वारस प्रमाणपत्र  आदी सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे सुनील शेळके यांनी यावेळी सांगितले.
   
अशा आहेत सेवा..!

अकृषक शेतजमिनीचा प्रस्ताव तयार करणे व त्याकरिता आवश्यक त्या परवानगी मिळवण्यासाठी कायदेशीर सहाय्य, आदिवासी ते आदिवासी शेत जमिनीची विक्री परवानगी, आदिवासी ते गैर- आदिवासी शेत जमिनीची विक्री परवानगी, वर्ग २ च्या शेतजमिनीची विक्री परवानगी, सिलिंग कायद्या अंतर्गत मिळालेल्या शेतजमिनीची विक्री परवानगी, वर्ग २ ची शेती वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा प्रस्ताव बनवणे, पोटखराब "अ" शेती वहिती आणण्याचा प्रस्ताव बनवणे, तुकडेबंदी कायद्यांतर्गत तुकडे विक्री परवानगी, कूळ कायद्यांतर्गत मिळालेली शेती वर्ग १ मध्ये रूपांतरित करणे, शेतजमिनीसंबंधी भूदान यज्ञ मंडळाची सर्व कामे, ७/१२ उताऱ्यातील क्षेत्रफळ व नावांची दुरुस्ती प्रकरणे, सिडको, म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए, पीएमएमआरडीए सर्व प्रकारच्या सेवा अभिता लॅन्ड सोल्युशन्स प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून पुरवण्यात येतात. शेतकरी, ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थापक तथा सीईओ सुनील शेळके यांनी केले आहे.