पहिल्याच निकालात बुलढाण्याच्या "पहेल इन्स्टिट्यूट"चा डंका! पायल रोकडे, वैष्णवी देशमुख नीट च्या गुणवत्ता यादीत! गुणवंत म्हणतात आता कोटा अन लातूरला जायची गरजच नाय, बुलढाण्यातच शिकून असे व्हा डॉक्टर!!

 
mu
बुलढाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): डॉक्टर होण्यासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेची तयारी करायची म्हणजे कोटा, लातूर, नांदेडला जाण्यावाचून पर्यायच नाही या मानसिकतेला छेद देण्याचे काम बुलडाण्याच्या लेकिंनी  बुलडाण्यातच राहून केलेय. कठोर मेहनतीच्या जोडीला मिळालेले "पहेल इन्स्टिट्यूट" चे योग्य मार्गदर्शन या बळावर कु.पायल रोकडे आणि कु. वैष्णवी देशमुख  या जिजाऊंच्या लेकी नीट च्या गुणवत्ता यादीत झळकल्या आहेत.

mu

 कु. पायल रोकडे हिने  ७२० पैकी ५०४ तर कु. वैष्णवी देशमुख हिने ५०२ गुण मिळवले आहेत. कोरोनाचा कठीण काळ आणि तयारीसाठी पुरेसा वेळ नसतांनाही अडचणींवर मात करून जिद्द आणि चिकाटीने  पहेल इन्स्टिट्यूटच्या तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनात दोघींनी हे यश मिळवले आहे. डॉक्टर होण्यासाठी लातूर, कोटा, नांदेडला जावेच लागते हा भ्रम आता विद्यार्थी व पालकांच्या मनातून काढून टाकण्यात पहेल इन्स्टिट्यूट कमालीचे यशस्वी होतांना दिसत आहे.

कोटा, लातूर,नांदेड ला जावून प्रचंड खर्च केल्यापेक्षा बुलडाण्यातच नीट परीक्षेची निट तयारी पहेल इन्स्टिट्यूट करून घेत असल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात  बुलडाण्यात  नीट परीक्षेचे सर्वोत्तम निकाल लागतील व विद्यार्थ्यांना  बुलडाण्यातच राहून  उत्तम तयारी करता येईल  असा विश्वास पहेल इन्स्टिट्यूट चे संचालक तथा बायोलॉजी विषयाचे तज्ञ प्राध्यापक निखिल श्रीवास्तव सर यांनी व्यक्त केला आहे.

 पहेल इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. राजेश्वर उबरहंडे, संचालिका सौ  विद्या अरविंद पवार, व्यवस्थापक  श्री . सिध्देश्वर मंडलकर, प्रा. प्रवीण रोकडे, प्रा. अर्जुन पंडित, श्री. चेतन प्रधान, तेजस्विनी चौधरी मॅडम, नयन इंगळे मॅडम, श्री. नामदेव हिवाळे यांनी या दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.