बुलडाण्याला लाभेल २५ पुतळ्यांचे वैभव! आमदार संजय गायकवाडांचा पुढाकार!कारंजा चौकात साकारणार भारतमाता !

 
jbkgh
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आमदार संजय गायकवाड यांच्या पुढाकारातून शिवस्मारकासह जवळपास २५ समाजाचे दैवत, महापुरुषांच्या  पुतळ्यांची स्थापना होत आहे. त्यामुळे बुलडाण्याची ओळख स्टॅच्यू सिटी अर्थात पुतळ्यांचे शहर अशी झाल्यास नवल वाटणार नाही. कारंजा चौकात एका सौंदर्यवतीचा मागे पुतळा काढण्यात आला होता.आता त्या जागी भारतमातेचा ९ फुट उंच पूर्णाकृती पुतळा साकारणार असल्याचे गायकवाड यांनी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर घोषित केले. त्यांनी आज २६ जानेवारीला पुतळा सौंदर्यकरण्याच्या कामाचे निरीक्षण केले.

 महाराष्ट्रातील गड किल्ल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या ऐतिहासिक पाऊलखुणा जोपासल्यात. राष्ट्रमाता जिजाऊंच्या जिल्ह्यात शिवरायांचा इतिहास भावी पिढीला प्रेरणा देत राहावा या उद्देशाने मुंबईनंतर बुलडाण्यात प्रथमच शिवउद्यान साकारत आहे. या शिवउद्यानात २४ मावळे, ८ घोडे,२ हत्ती, ४ तोफा,४ बुरुजांची प्रतिकृती साकारत आहे. शिवाय १९ चौकांमध्ये विविध समाजातील दैवत, महापुरुषांचे २५ पुतळे उभारण्यात येणार आहे.

याचे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आमदार संजय गायकवाड यांनी कारंजा चौकात भारतमातेचा पुतळा उभारणार असल्याचे जाहीर केले. यावेळी भारत मातेच्या ९ फूट उंच पूर्णाकृती पुतळा सौंदर्यकरण्याच्या कामाचे निरीक्षण करण्यात आले. येथे असलेल्या दुर्गा मंदिरा समोर भारतमातेचा चेहरा असेल आणि विरुद्ध दिशेने देखील भारतमातेचा चेहरा असणार असल्याचे गायकवाड म्हणाले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, नगरसेवक अरविंद होंडे,कमलेश कोठारी,अशोक व्यास,बंटी छाजेड,रवी भगत,लक्ष्मण ठाकरे, विष्णू ढेंबरे यांच्यासह बुलडाणा शहरातील नागरिक,शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.