


बुलडाणेकरांनो उच्च दर्जाचे ड्रायफ्रुट्स हवेत? सर्क्युलर रोडवरील पर्वणी स्पेशल ड्रायफ्रुट्सला एकदा भेट द्याच....
बुलडाणा शहरातील सर्क्युलर रोडवरील बाहेकर कॉम्प्लेक्स मध्ये हे ड्रायफ्रूट्सचे सुसज्ज दालन आहे. या ठिकाणी सर्व प्रकारच्या लाडूचे सामान, लाकडी घाण्याचे तेलही मिळते. विशेष म्हणजे मोफत होम डिलिव्हरीसुद्धा दिली जाते. दुकानमालक श्री. जाधव हे मूळचे सावळा (ता. बुलडाणा) येथील असून, कृषी पदवीधर आहेत. ग्राहकांना चांगल्या दर्जाचे ड्रायफ्रूट्स देण्यासाठी त्यांची धडपड पहायला मिळते. त्यामुळे ग्राहकही आकर्षित होत आहेत.
हे दालन सुरू करून त्यांना जवळपास दोन वर्षे होत आहेत. अल्पकाळात त्यांनी ग्राहकांचा संपादन केलेला विश्वास पाहून सारेच थक्क आहेत. या यशामागे त्यांचा प्रामाणिकपणा आहे. त्यांचे वडील तुळशीराम जाधव, आई सौ. दुर्गा आणि पत्नी सौ. कीर्ती, भाऊ अभिजीत यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याने आजवरची प्रगती शक्य झाली, असे भावोद्गार अनिरुद्ध जाधव यांनी काढले. पर्वणी स्पेशल ड्रायफ्रूटचा संपर्क क्रमांक : मो. 9604742560/ 9604742584