बुलडाण्यात होणार बुलडाण्याचा महावक्ता वक्तृत्व स्पर्धा! विदर्भ सांस्कृतिक मंच आणि बुलडाणा अर्बंनचे आयोजन

 
maik
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  विदर्भ सांस्कृतिक मंच व बुलडाणा अर्बंनच्या सांस्कृतिक विद्यमाने बुलडाण्याचा महावक्ता वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ७ आणि ८ जानेवारीला सहकार विद्या मंदिर आणि बुलडाणा अर्बंन रेसिडन्सी हॉल येथे ही स्पर्धा पार पडणार आहे.  

 या स्पर्धेकरिता देश आणि परदेशातील चालू घडामोडींवर आधारित विषय असणार आहेत. तीन गटात ही स्पर्धा होणार असून शालेय गट १० ते १६ वर्षे, दुसरा खुला गट वय १७ ते ३५ वर्षे तर गट महिलांचा असणार आहे त्याची वयोमर्यादा ५० वर्षे इतकी असणार आहे. खुल्या आणि महिला गटासाठी  शनिवार ७ जानेवारीला चिखली रोडवरील सहकार विद्या मंदिरात ही स्पर्धा होणार आहे.

बुलडाणा अर्बनचे सीएमडी डॉ.सुकेश झंवर स्पर्धेचे उद्घाटन करणार आहेत. शालेय गटाची स्पर्धा ८ जानेवारीला बुलडाणा अर्बन रेसिडन्सी हॉल येथे होणार आहे. स्पर्धेनंतर लगेच त्या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यात येईल. स्पर्धा सकाळी १० वाजता सुरू होणार असून एक तास आधी येऊन स्पर्धकांनी नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.