बुलडाणा जिल्हा ' टँकरमुक्त '! अधिग्रहण' चे देखील सुटले ग्रहण!!

 
tankar
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह) जिल्हा वासियानो , बातमीचे हेडिंग वाचून  एकदम हुरळून जायचे कारण नाय! कारण जिल्हा टँकरमुक्त झाला खरा पण तो तूर्तास किंबहुना काही महिन्यांसाठीच आहे. पुढच्या उन्हाळ्यात ( टँकर) पुन्हा जैसे थे राहणारच आहे...

पावसाळ्यात कितीही पाऊस पडो, उन्हाळ्यात टँकर व खाजगी विहीर अधिग्रहण चे ग्रहण लागते म्हणजे लागतेच! यंदाचे वर्ष देखील याला अपवाद नव्हते. उलट यंदा टँकरचा मुक्काम जुलैच्या अंतिम टप्प्यातही कायम होता. यंदा 32 टँकर व सुमारे 235 खाजगी अधिग्रहित विहिरीद्वारे हजारो गावकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यात आला. 22 जुलैपर्यंत मात्र हे सर्व टँकर व अधिग्रहण बंद करण्यात आले. यामुळे तूर्तास तरी जिल्हा टँकरमुक्त झालाय. दिसते तसं नसते या न्यायाने  वाचकांनी , हेडिंगवर जाऊ नका त्यातील ' तूर्तास' हा छुपा शब्द लक्षात घ्यावा...