बुलडाणा अर्बनने बंदीवानांवर पांघरली उबदार चादर!डॉ. सुकेश झवर यांनी सहृदयतेचा परिचय

 
yujyf
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  चूक सुधारण्याची एक तरी संधी आयुष्यात प्रत्येकाला मिळाली पाहिजे, या तत्त्वाने गुन्हेगारांच्या बाबतीत देखील अशीच भूमिका कायदा आणि सुव्यवस्था बजावते आहे. कारागृह ही गुन्हेगाराला केवळ शिक्षा भोगण्याची वास्तू नसून त्याचे पुनर्वसन आणि त्याच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी निर्माण केलेली एक व्यवस्थाच आहे, हे बुलडाणा कारागृहात जाणवते. दरम्यान बुलडाणा अर्बन व  बुलडाणा चॅरिटेबल ट्रस्टने ४०० बंदिवानांना कडाक्याच्या थंडीत ब्लॅंकेट वाटप करून डॉ. सुकेश झवर यांनी सहृदयतेचा परिचय दिला.

बुलडाणा जिल्हा कारागृहात ४०० बंदीवान आहेत. या बंदीवानांच्या सोयीसुविधासाठी कारागृह प्रशासन झटते. बुलडाणा अर्बन देखील समाजसेवेत अग्रेसर आहे. यापूर्वीही बुलडाणा अर्बन कडून वॉटर एटीएम, टेलिव्हिजन सिस्टीम, न्यूज पेपर अशी सुविधा बंदीवानांना देण्यात आली. तसेच विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. सध्या जिल्ह्यामध्ये १३ ते २४ डिग्री एवढे तापमान आहे. थंडीने जिल्हा गाराठला आहे. त्यामुळे बुलडाणा अर्बन, बुलडाणा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बंदीवानांना उबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.