बुलडाणा एलसीबीची गुटख्या विरोधात दणकेबाज कारवाई! जळगाव जामोद तालुक्यात २३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

 
yfuufu
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  गुटका माफिया एलसीबीच्या रडारवर आहेत. बुलडाणा एलसीबी प्रमुख अशोक लांडे यांनी अवैध गुटखा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. २५ जानेवारीला जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी ते कुरहा रोड वरील पिंपळगाव शिवारात अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा टाकून, वाहनासह २३ लाख ४० हजार रुपयांचा गुटखा जप्तीची धडाकेबाज कारवाई करण्यात आली.यामुळे  गुटखा माफीयांचे धाबे दणाणले आहे. आरोपी हरी ओम कराळे रा. निंबा तालुका बाळापूर जिल्हा अकोला असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली.

२०२३ या वर्षातील ११ ते १५ जानेवारी दरम्यान  जिल्ह्यातील शेगाव, चिखली,खामगाव,रायपूर, हिवरखेड, देऊळगाव राजा या ६ ठिकाणी विविध कारवाईत ११ लाख ४० हजार ५७५ रुपयांचा एलसीबीने मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर २५ जानेवारीला २३ लाख ४० हजारांची ही मोठी कारवाई आहे. सदर आरोपीच्या ताब्यातून १३,३४,८४० रुपयांचा विविध कंपनीचा गुटखा,१०,००,००० रुपयांचे बोलेरो वाहन, ६ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण २३ लाख ४० हजार ८१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एलसीबी प्रमुख अशोक लांडे यांच्या नेतृत्वात सुधाकर काळे,संजय नागवे,अनंत फरताळे, संजय भुजबळ,राजू आडवे, कैलास ठोंबरे यांनीही कारवाई केली. या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.