Breaking बुलडाण्यातील चांडक लाईफ इनशुरन्सच्या कार्यालयाला आग! १० लाखांचे नुकसान; ३ लाखांची कॅश जळाली

 
vbnbm
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरातील चिखली रोडवर असलेल्या चांडक लाईफ इन्शुरन्सच्या कार्यालयाला आज १४ मे च्या दुपारी दोनला अचानक आग लागली. या आगीत कार्यालयातील लॅपटॉप, प्रिंटर, फर्निचर, एसी, कागदपत्रे, व जवळपास ३ लाख रुपयांची रोकड  असे एकूण अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाले.
बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक यांच्या निवासस्थानाला लागूनच चांडक लाईफ इन्शुरन्स चे कार्यालय आहे. कार्यालयात कामकाज सुरू असताना एसी मशीन मध्ये शॉर्टसर्किट झाले आणि अचानक भडका उडाला. त्यामुळे कर्मचारी कार्यालयाबाहेर धावले. घटनेची माहिती मिळताच बुलडाणा नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. जवळपास ४५ मिनिटानंतर आग आटोक्यात आली. वृत्त लिहिस्तोवर पंचनाम्याची प्रक्रिया सुरू होती.