ब्रेकिंग! बुधवार ठरला हॉट डे! तापमान ४२ डिग्रीच्या घरात

 
456
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आटपाट बुलडाणा नगरीसाठी २७ एप्रिल हा दिवस यंदाच्या उन्हाळ्यातील आजवरचा सर्वात हॉट डे ठरलाय! आज बुधवारी बुलडाण्यातील तापमापकाचा पारा ४२ डिग्रीच्या घरात पोहोचला. आज ४१ .८ डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाल्याने लाखावर शहर व परिसरवासीयांना सूर्य आग ओकू लागल्याचा नव्याने अर्थ समजला...
 

अलीकडे हवामान खाते भलतेच कार्यक्षम अन त्यांचे अंदाज अगदी अचूक ठरायला लागले! कालपरवा खात्याने मंगळवार पासून गुरुवार पर्यंत जिल्ह्यात उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज वर्तविला. शहर परिसराच्या तापमापानाची अधिकृत नोंद घेणाऱ्या तापमापकाने हा अंदाज आज अचूक ठरविला.

मागील काही दिवसांपासून ४० डिग्रीच्या आसपास रेंगाळणारा पाऱ्याने आज बुधवारी ४१ चा आकडा पार केला पण तो  तिथे थांबला नाही त्याने आजवरच्या सर्वोच्च तापमानाचा ( ४१.५डिग्री चा)  आकडा गाठल्यावर तिथे स्टॉप घेईल असे वाटले. मात्र त्याने आणखी पुढे झेप घेत ४१ .८ डिग्रीचा पल्ला गठीत यंदाचे सर्वोच्च रेकॉर्डची नोंद केली. लवकरच बुलडाणा ४२ चा आकडा पार करेल अशी धास्तीयुक्त शक्यता यामुळे वर्तविण्यात येत आहे.