पाकिस्तानचा जयजयकार करणाऱ्या शाहरुख खानच्या 'पठाण'ला बॉयकॉट करा ! बुलडाण्यात'पठाण'ला हिंदुत्ववादी संघटनेचा विरोध

 
Fguu
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शाहरुख खानच्या  'पठाण' चित्रपटाला बिकिनीवरून  हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध असून हा विरोध काही थांबताना दिसत नाही. बुलडाण्यात देखील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल मातृशक्ती,व सकल हिंदू समाजाच्या वतीने आज विरोध दर्शविण्यात आला. दरम्यान देशात राहून पाकिस्तानचा जयजयकार करणाऱ्या शाहरुख खानच्या पठाणला बॉयकॉट करावे आवाहन विश्व हिंदू परिषदचे विदर्भ प्रांत संयोजक अमोल अंधारे यांनी खामगाव येथे   केले.

शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट  २५ जानेवारी प्रदर्शित झाला आहे. कुठे शाहरुखचे चाहते 'पठाण' पाहायला थिएटरमध्ये गर्दी करतायत. कुणी चित्रपटगृहाबाहेर फटाके फोडतायत तर कुणी नाचताना दिसताहेत.काही चाहते तर चित्रपट पाहिल्यानंतर भावनिक झालेले देखील पाहायला मिळतायत. एकीकडे असं चित्र असलं तरी दुसरीकडे वेगळीच बाजू समोर येते आहे. 'पठान'ला बॉयकॉट करणाऱ्या लोकांनी आता देशभरात आंदोलन करायला सुरुवात केली आहे.'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणं रिलीज झाल्यावर हा विरोध सुरू झाला होता. या चित्रपटातील दीपिकाची भगव्या रंगाची बिकिनी काही नेटकऱ्यांना मुळीच पसंत पडली नव्हती. चित्रपटाच्या विरोधात अनेक संघटना उभ्या राहिल्या आहे.

काहींनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली, तर काहींनी चित्रपटात पुन्हा काम करून काही दृश्ये हटवण्याचा सल्ला दिला.बुलडाण्यातील खामगाव येथे देखील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल मातृशक्ती,व सकल हिंदू समाजाच्या वतीने सनी पॅलेस गजानन टॉकीज संचालकांना भेट देऊन, चित्रपटातील अश्लील दृश्य व धार्मिक भावना दुखविणारे दृश्य हटविण्याबाबत मागणी करण्यात आली. दरम्यान २५ मिनिटांचे आक्षेप असणारे दृश्य पाठविण्यात आल्याचे संचालकाकडून सांगण्यात आले. हिंदू समाजाच्या भावना दुखवणार असे चित्रपट बनवू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. भारत देशात राहून भारतातलाच पैसा घ्यायचा नशाखोरीला प्राधान्य द्यायचे तसेच लव जिहाद, धर्मांतरणाला प्रोत्साहन द्यायचे असे काम काही अभिनेते करीत आहेत. मात्र हिंदू समाजावरील अन्याय सहन करणार नाही. असे चित्रपट बंद झाले पाहिजेत. शाहरुख खानचा पठाण चित्रपट बॉयकॉट करावा या चित्रपटाचा निषेध करावा असे हवा नही यावेळी करण्यात आले आहे. यावेळी विधीज्ञ अमोल अंधारे, राजेंद्र सिंह राजपूत, पवन माळवंदे, सचिन चांदूरकर,अमोल जोशी, पांडुरंग गोरे आदी अनेकांची उपस्थिती होती.