धन्य आज दिन संत दर्शनाचा! शंकराचार्य रामदेवानंद सरस्वती आज बुलडाण्यात; आ. संजय गायकवाड यांच्या प्रयत्नातून होणार वारकरी भवनाचे भूमिपूजन; जाणून घ्या या अनोख्या सोहळ्याविषयी...

 
jggy
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या वारकरी भवनाचे भूमिपूजन आज, १३ ऑक्टोबरला संपन्न होत आहे. या विशेष सोहळ्यासाठी शंकराचार्य रामदेवानंद सरस्वती आज बुलडाणा येथे येणार आहेत.सकाळी ९ ते २ यावेळेत कृषी उत्पन्न बाजार समिती, रामनगर बुलडाणा येथे हा दिमाखदार सोहळा संपन्न होणार असून मोठ्या संख्येने वारकरी या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातल्या तसेच जिल्ह्यात प्रवासासाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी हे वारकरी भवन असणार आहे. या सोहळ्याला खासदार प्रतापराव जाधव, नाशिकचे  मठाधीपती रामकृष्ण महाराज लवाहितकर, रामेश्वर महाराज शास्त्री, नितीन महाराज मोरे, महाराष्ट्र  राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाशबुवा जवंजाळ, स्वामी हरीचैतन्यजी महाराज यांच्यासह संतमंडळी उपस्थित राहणार आहेत. यामुळे बुलडाणेकरांना आज संताचे दर्शन घेता येणार आहे.