मोठी बातमी! रविकांत तुपकरांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला सुरुवात; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही बैठकीला उपस्थित! अपेक्षित निर्णय न आल्यास तुपकर जलसमाधी घेण्यावर ठाम! बैठकीकडे महाराष्ट्राचे लक्ष

 
मुंबई( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): शेतकरी नेते रविकांत तुपकर हजारो शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलन करायला मुंबईत दाखल झालेले आहेत. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांचा हा लढा सुरू आहे. दरम्यान आज, त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चर्चेचे निमंत्रण देण्यात आले. तुपकरांनी निमंत्रण स्वीकारले असून थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी बैठकीला सुरुवात झाली आहे.

बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, सहकारमंत्री अतुल सावे हेदेखील उपस्थित आहेत. दरम्यान बैठकीत अपेक्षित निर्णय आला नाही तर अरबी समुद्रात जलसमाधी घेणारच असे तुपकरांनी बैठकीच्या आधीच जाहीर केल्याने बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.