मोठी बातमी! मेहकरचा तो व्हायरल व्हिडिओ खोटा..
Thu, 26 May 2022

मेहकर ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकरच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडिओ खोटा असल्याचे बुलडाणा लाइव्हच्या तपासणीत समोर आली आहे. "मेहकर तालुक्यातील अंजनी बु नरसी येथील पेट्रोल पंपावरील घटना . पेट्रोल भरतांना सावधान." असे कॅप्शन देऊन दोन दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल होत होता. मात्र तशी कुठलीही घटना जिल्ह्यात झाली नसल्याचे समोर आले.
व्हिडीओत पेट्रोल भरल्यानंतर एका मोटारसायकल मध्ये पेट्रोल भरण्याची नळी अडकते आणि नंतर स्फोट होऊन मोटरसायकल चालक जळतो असे दिसते. हा व्हिडिओ पेट्रोल पंपावरील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला असला तरी तो जिल्ह्यातला नाही. विशेष म्हणजे कॅप्शन देणार्यांनी मेहकर तालुक्यातील अंजनी बु नरसी असा उल्लेख केला आहे. मुळात अंजनी बु आणि नरसी ही दोन वेगवेगळी गावे आहेत.
नरसी हिंगोली जिल्ह्यातील गाव आहे. त्यामुळे कुणीतरी फॉरवर्ड केलेला हा व्हिडीओ जसाच्या तसा व्हायरल होत होता. त्याची सत्यता न तपासता तो मेहकर तालुक्यातील असल्याचे सांगत व्हिडिओ व्हायरल होत होता. काही जागरूक वाचकांनी हा व्हिडिओ बुलडाणा लाइव्ह ला पाठवला . बुलडाणा लाइव्हच्या पडताळणी व्हिडिओ जिल्ह्यातला नसल्याचे समोर आले.