मोठी बातमी! अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बुलडाणा जिल्ह्याला गिफ्ट! ५४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरात..! वाचा निधी कशासाठी?

 
iugt
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार संजय गायकवाड यांनी ५४ कोटी रुपयांच्या विकास निधीची मागणी केली होती. ही मागणी मंजूर करण्यात आल्याने बुलडाणा शहरात नव्याने जिल्हा न्यायालयाची प्रशस्त इमारत साकारणार आहे.

आज १९ डिसेंबर पासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली.बुलडाणा विधानसभा मतदारसंघात विकास कामे खेचून आणण्याच्या दृष्टीने आम. संजय गायकवाड प्रयत्न करत आहेत. बुलडाणा शहरातील जिल्हा न्यायालयाची इमारत इंग्रज कालीन आहे. त्या ठिकाणी दर्जेदार व प्रशस्त इमारत व्हावी,वकील संघासाठी वकील संघाचा बार कौन्सिल ही उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी वकील संघाची होती. ही बाब लक्षात घेऊन आम. संजय गायकवाड यांनी जिल्हा न्यायालयाची इमारत यासह शहरातील विविध विकास कामासाठी ५४ कोटी रुपयांची मागणी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केली. पहिल्या दिवशीच पुरवणी मागणीमध्ये ५४ कोटी रुपयांच्या विकास निधीला मंजुरात देण्यात आली. दरम्यान जिल्हा न्यायालयाची नवीन इमारत बेसमेंट तळमजला अशी पाच मजली इमारतीचे नवनिर्माण केले जाणार आहे. यासाठी तब्बल ४३ कोटी ९३ लाखाचा निधी मंजूर झाला आहे.

तसेच बुलडाणा जिल्ह्यातील शेलापुर -  तालखेड - महाल पिंपरी -  आड विहीर -  वरुड मार्ग रुंदीकरणासह  सुधारण्यासाठी ४ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातील माळेगाव -  निपाणा - सावरगाव  - शेलगाव बाजार - दाताळा रस्त्याच्या सुधारण्यासाठी १ कोटी रुपये मिळणार आहे.  जिल्ह्यातील दाताळा - दाभाडी - पानेरा - गिरडा - चौथा - जामठी - धाड रस्ता तसेच पैनगंगा नदीवर लहान पुलाचे काम करिता ५ कोटी रुपये असा एकूण ५४ कोटी ९३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.