Big Breaking जिल्ह्यातील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द!

 
5635
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यासह राज्यभरातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. तसे आदेश काल, १९ एप्रिल रोजी पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून  सर्व पोलीस आयुक्तालये आणि पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाला प्राप्त झाले आहेत.

सध्या रमजानचा महिना सुरू आहे. राज्यभरात सध्या मशिदीवरील भोंग्याबाबत काही नेत्यांच्या वक्तव्याने कोणत्याही क्षणी तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे दोन दिवसांपूर्वी धार्मिक तेढ निर्माण झाल्याची घटना घडली होती.

त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यातील  २७३० पोलीस कर्मचाऱ्यांच्या किरकोळ रजा आणि अर्जित रजा पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. येणाऱ्या काळात रमजान ईद हा सण असल्याने सुट्ट्या रद्द कराव्यात असे कारण देण्यात आले आहे.