भारत जोडो यात्रा UPDATE! आमदार डॉ.राजेंद्र शिगणें राहुल गांधीसोबत भारत जोडो पदयात्रेत सहभागी..!
Updated: Nov 18, 2022, 12:13 IST

शेगाव( टीम बुलडाणा लाइव्ह: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज ,१८ नोव्हेंबरला जिल्ह्यात आहे. दुपारी तीनला शेगावात जाहीर सभेला खा. राहुल गांधी संबोधित करणार आहेत. दरम्यान सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे आज भारत जोडो पदयात्रेत सहभागी झाले आहेत.
खा. राहुल गांधी यांच्यासमवेत अकोला जिल्ह्यातील कुपटा येथून आ. डॉ. शिंगणे पदयात्रेत सहभागी झाले. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे हे सुद्धा त्यांच्या सोबत होते. यावेळी त्यांनी खा. राहुल गांधी यांच्याशी विविध मुद्यांवर संवाद साधला. दरम्यान आज दुपारी खा. राहुल गांधी शेगावात पोहचल्यानंतर श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते जाहीर सभेला संबोधित करणार आहे. या सभेला विक्रमी गर्दी जमणार असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.