सावधान! तीनच दिवसात गाठली शंभरी!! पॉझिटिव्ह चा आकडा दोनशेपल्याड; गावखेड्यात आडवा तिडवा घुसला..!

 
korona
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राजकीय अस्थिरता, रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार यामुळे सर्वपक्षीय राजकारणी राजकारणात बुडालेले अन यामुळे निर्धास्त असलेले प्रशासन या विचित्र परिस्थितीत जिल्ह्यात कोरोना नव्याने मुसंडी मारत असल्याच्या गंभीर धोक्याकडे या दोन्ही घटकांचे दुर्लक्ष होत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.     हे दोन्ही घटक ताळ्यावर नसल्याने सर्वसामान्य जनतेला समजवणार कोण? अशी गत असल्याने जनता जनार्दन सुसाट सुटले आहे...

bade

मागील कैक दिवसापासून वातावरण ढगाळ, रोगट असून पावसाची रिपरिप अखंडित सुरू आहे. त्यात सूर्याचे दर्शनच नाही! यामुळे सर्दी, खोकला, तापाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. या सर्व बाबी कोरोनाच्या पथ्यावर पडणाऱ्या आणि प्रसाराला अनुकूल अश्याच आहे. मागील 3 दिवसातच कोविदच्या रुग्ण संख्येने शंभरी पार केली आहे. 16 जुलैचा अहवाल 40 पॉझिटिव्ह, 15 ला 34 तर 14 तारखेला 36 रुग्ण अशी आकडेवारी आहे. जेमतेम 3 दिवसातच पॉझिटिव्ह चा आकडा 110 वर पोहोचलाय! आजघडीला रुग्ण संख्या 210 वर येऊन ठेपली आहे. 

गावखेडीही विळख्यात

 दरम्यान जून मध्ये शहरी भागापुरता मर्यादित असणारा कोविड कुमार जुलै मध्ये मुसंडी मारीत ग्रामीण भागातही आडवा तिडवा घुसलाय! केवळ 16 जुलैच्या आणि एकाच तालुक्याच्या अहवालावर नजर मारली तरी गंभीर धोका लक्षात येतो. देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणाराजा, जवळखेड , सिनगाव जहांगीर, पोखरी, जवळखेड, कुंभारी, शिरला, निमखेड, उंबरखेड, किन्ही पवार या खेडेगावातही रुग्ण आढळून आले आहे. इतर तालुक्यातील ग्रामीण भागातही रुग्ण आढळून येणे  धोक्याची घंटीच आहे.  पण ती सध्या नेत्यांना ऐकू येत नाहीये. लोकशाही असल्याने मग ती इतर समाज घटकांना देखील ऐकू येत नाही एवढंच...