बाब्बो..! लोणारच्या भुमराळ्यात एका बकरीने दिला तब्बल "इतक्या" पिल्लांना जन्म .! पहायला जमली गर्दी..!!

 
bakri
लोणार( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एक बकरी सामान्यतः दोन ते तीन पिलांना जन्म देत असते. फार फार तर अगदी लाखात एखादवेळा हा आकडा चारवर जातो. मात्र लोणार तालुक्यातील भुमराळा गावात एका बकरीने तब्बल ५ पिलांना जन्म   दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष आणि तिची पाचही पिल्ले सुखरूप आहेत.

 भुमराळा येथील अल्पभूधारक शेतकरी दिलीप भिवा शेळके हे शेतीसोबत शेळीपालन करतात. त्यांच्या बकरीने आज ,५ सप्टेंबर रोजी ५ पिलांना जन्म देऊन विक्रम केलाय. ही वार्ता पसरताच गावकऱ्यांनी बकरी आणि पिलांना बघण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. बकरीने पाच पिलांना जन्म देण्याच्या घटना अपवादात्मक आहेत. साधारण  फार फार तर बकरी ४ पिलांना जन्म देते. मात्र तब्बल ५ पिलांना जन्म दिल्याने कुतूहल निर्माण झाले आहे.