BULDANA LIVE SPECIAL! ४५ ग्रामपंचायत साठी अर्जच नाय! ७ अविरोध; आता केवळ ४ ठिकाणीच निवडणूक!!

 
adhikari
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मृग नक्षत्राच्या तोंडावर होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका म्हणजे केवळ औपचारिकता ठरलीय! तब्बल ४५ ग्रामपंचायत मध्ये एकही उमेदवारी अर्जच नाही, ७ ठिकाणी अविरोध निवड झाली. या मजेदार घडामोडी मुळे आता केवळ ४ ठिकाणी ४ जागांसाठी ही निवडणूक होणार हाय!!

विविध कारणांमुळे रिक्त असलेल्या ६० ग्रामपंचायतींच्या( ओबीसी राखीव जागा वगळून)  ८० जागांसाठी येत्या ५ जूनला होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.  मात्र खरिपाची धामधूम, ओबीसी जागा नसणे आदी कारणामुळे ग्रामीण कार्यकर्त्यांनी या लढतीकडे पाठ फिरविली! यापरिणामी तब्बल ४५ ठिकाणी एकही अर्ज सादर करण्यात आला नाही. याशिवाय ७ ठिकाणची लढत अविरोध ठरली.  दत्तपुर, घाटनांदरा, केशवशिवनी, मांडवा समेट डोंगर, सावरगाव तेली, लाखनवाडा, इसारखेड येथील प्रत्येकी एका सदस्याची अविरोध निवड करण्यात आली.

४ जागांसाठीच लढत

 ४ ग्रामपंचायत मधील ४ जागांसाठी मात्र एकमत न झाल्याने अखेर लढत अटळ ठरली! यामध्ये अंढेरा( देउळगावराजा) हरणखेड( मलकापूर) , सारोळा मारोती, बोराखेडी( मोताळा) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तिथे ५ जून रोजी   मतदान होणार असून जागा ४ असल्या तरी ९ उमेदवार रिंगणात उतरल्याने अत्यंत चुरशीने या निवडणुका पार पडणार आहे.