BREKING: खडकपूर्णा ८४ टक्के भरले! तीन जिल्ह्यातील ३४ गावात रेड अलर्ट !! तीन दरवाजे उघडले

 
dharan
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरण  ८४ टक्के भरल्याने ३ जिल्ह्यातील  तब्बल ३४ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

जिल्ह्यातील बुहत प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा ची व्याप्ती पसारा मोठा आहे. आजही धरणक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणात ५२० मीटर जल पातळी  असून हा जलसाठा ८४ टक्के इतका झाला आहे. यामुळे आज दुपारी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहे.

 यापरिणामी देऊळगाव राजा तालुक्यातील निमगाव गुरू, सावंगी टेकाळे, डीग्रस बुद्रुक व खुर्द, टाकरखेड वायाळ व भागीले, सिंदखेडराजा तालुक्यातील निमगाव वायाळ, साठेगाव, हिवरखेड, राहेरी खुर्द, तडेगाव, राहेरी बुद्रुक, ताड शिवणी, देवखेड, पिंपळगाव कुडा, लिंगा , खाप खेडा, रायगाव, सावरगाव तेली या  बुलडाणा जिल्ह्यातील गावांचा समावेश आहे. याशिवाय जालना जिल्ह्यातील किरला, दुधा, सासखेडा, लिंबखेडा, हनूमंतखेड, उस्वदा, टाकलखोपा, इंचा, कानडी, वाघाला, देवठाणा आणि हिंगोली जिल्ह्यातील  वझर भामटे, सावखेड निबु, धानोरा या गावांना सतर्क करण्यात आले आहे. नागरिकांनी सुरक्षित हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.