BREAKING! पेनटाकळी चे 2 दरवाजे उघडले! नदी काठच्या गावांना अलर्ट

 
efrgr
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):जलसाठ्यात होणारी सततची वाढ लक्षात घेता पेन टाकळी धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे पुरजन्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, आज दुपारी प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे नदीकाठच्या गावातील गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

जलाशय परिचालन सूची नुसार धरणात जुलै अखेर 69.57 टक्के पाणी साठा असणे निर्धारित करण्यात आला आहे. प्रकल्पात इतका जलसाठा झाल्याने धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आज 22 जुलैला दुपारी 3 वाजताच्या आसपास धरणाचे 1 व 9 क्रमाकाचे दरवाजे 10 सेंटी मीटर इतके उघडण्यात आले. सध्या नदीपात्रात 669 क्यूसेक इतका विसर्ग सोडण्यात येत असल्याचे पेन टाकळी पूर नियंत्रण कक्षाच्या सूत्रांची ' बुलडाणा लाइव्ह ' सोबत बोलताना सांगितले. पाण्याची आवक पाहून विसर्ग जास्त किंवा कमी करण्यात येईल, अशी माहितीही या सूत्रांनी दिली. नदीकाठच्या गावातील गावकऱ्यांनी सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन करण्यात आल्याचे देखील सूत्रांनी स्पष्ट केले.