BIG BREKING महावितरणच्या मेंटेनन्स कार्यालयात रविकांत तुपकरांचे मुक्कामी आंदोलन! शेतकऱ्यांनी पैसे भरले, आत्ताच्या आत्ता डीपी द्या, तोपर्यंत उठणार नाही! जिल्हाभरातून शेतकरी बुलडाण्याकडे निघाले..

 
jugh
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रब्बी हंगामाची तयारी सुरू झाली असली तरी शेतकऱ्यांना वेळेवर रोहित्र मिळत नाही. जळालेले रोहित्र महिना महिनाभर दुरुस्त होत नाही. त्यामुळे अतिवृष्टीने खचलेल्या शेतकऱ्याच्या हातून रब्बीचे पीक जाण्याची देखील भीती निर्माण झाली आहे. महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तर देत आहेत. शेतकऱ्यांनी जळालेल्या रोहित्रांचे पैसे भरले मात्र अजून शेतकऱ्यांना रोहित्र मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जोपर्यंत रोहित्र मिळत नाही तोपर्यंत महावितरणच्या मेंटेनन्स कार्यालयातून उठणार नाही अशी भूमिका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी घेतली आहे. आज, १९ नोव्हेंबरच्या संध्याकाळपासून तुपकरांनी कार्यालयाच्या आवारात शेकडो शेतकऱ्यांसह ठिय्या मांडला आहे. दरम्यान जिल्हाभरातील शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बुलडाण्याच्या दिशेने रवाना झाल्याचे वृत आहे.

बुलडाणा शहरात चिखली रोडवर महावितरण चे हे मेंटेनन्स कार्यालय  आहे. जळालेले रोहित्र दुरुस्तीचे काम या कार्यालयातून चालते. शेतकऱ्यांनी दुरुस्तीचे पैसे भरले मात्र ऑईल नसल्याचे कारण सांगून शेतकऱ्यांना रोहित्र देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे रब्बीचे पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे तुपकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत शेतकऱ्यांना रोहित्र मिळत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही अशी भूमिका तूपकरांनी घेतली नाही.  त्यामुळे रविकांत तूपकर, विनायक सरनाईक, दत्तात्रय जेऊघाले, आकाश राऊत, शेख रफिक शेख करीम, दत्तात्रय परिहार, शिवदास परिहार  शेकडो शेतकरी आज महावितरण कार्यालयातच मुक्कामी थांबण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील आणखी शेतकरी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बुलडाण्याकडे निघाल्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.