BIG BREAKING एलसीबी प्रमुखांसह २ ठाणेदारांची बदली; बळीराम गीते आता बोराखेडीचे ठाणेदार; चिखलीचे ठाणेदार लांडे सांभाळणार "एलसीबी"चा प्रभार..!
Dec 30, 2022, 16:31 IST
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पोलीस दलामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बदलीसत्र सुरूअसते.जिल्ह्यात नवे पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी नव्यानेच कार्यभार सांभाळला. दरम्यान आज बुलडाणा व चिखलीतील ३ पोलिसांच्या बदलीचा आदेश धडकला.
३० डिसेंबर रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत आस्थापना मंडळाची बैठक घेण्यात आली. बुलढाणा पोलीस दलाच्या आस्थापना बैठकीतील निर्णयानुसार,पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी बुलडाणा येथील २ तर चिखली येथील एका पोलिस अधिकाऱ्याची तात्पुरत्या स्वरूपात बदली केली आहे. बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख बळीराम गिते यांची बदली बोराखेडी पोलीस स्टेशन मध्ये ठाणेदार म्हणून करण्यात आली आहे. तर येथीलच कल्याण शाखेतील पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांची बदली जळगाव जामोद पोलीस स्टेशनला ठाणेदार म्हणून करण्यात आली. तसेच चिखली येथील पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारी अधिकारी पदी पदस्थापना देण्यात आली आहे.