BIG BREAKING: 5 प्रकल्पातील विसर्ग सुरूच! 'वान' चा बंद पण... धोका कायम!! गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

 
xcg

 बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  कॅचमेंट क्षेत्रात पडणाऱ्या सततच्या पावसाने जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या 5 प्रकल्पातून विसर्ग सुरू असून वान चा  बंद करण्यात आला असला तरी नदी काठच्या गावांना धोका कायम आहे.

जिल्ह्यातील 100 टक्के जलसाठा असलेल्या उतावली मधून 5 सेंमी, मस मधून 5 सेंमी, कोराडी मधून 40 सेंमी इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. 84 टक्के जल पातळी असलेल्या खडकपूर्णा 3 गेट उघडे असून त्यातून 30 सेंमी विसर्ग वाहत आहे. 79 टक्के जलसाठा असलेल्या पेन टाकळी चे 2 दरवाजे सुरू आहे. 

बुलडाणा अकोला सीमेवरील वान धरणाचा विसर्ग आज 10 ऑगस्टला सकाळी 7 वाजता बंद करण्यात आला आहे. सध्या धरणात 68.73 टक्के इतकी साठा असून 405.90 मीटर इतकी जल  पातळी आहे. या तुलनेत नळ गंगा मध्ये 53 तर तोरणा मध्ये 34 टक्केच जलसाठा आहे.