BIG BREAKING! जिल्ह्यात ७ मंडळात कोसळधार !! पाऊसच पाऊस चोहीकडे: दैनंदिन व्यवहार ठप्प..!!

 
pani
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) दीडेक दिवसाच्या ब्रेक नंतर पुन्हा हजेरी लावणाऱ्या वरुणराजाने जिल्ह्यात पुन्हा दमदार पुनरागमन केलं! जिल्ह्यातील घाटाखालील तब्बल 7 महसूल मंडळात धोधो पावसाने हजेरी  लावली असून तिथे अतिवृष्टी ची नोंद झाली आहे. यामुळे शेतीसह अन्य दैनदिन व्यवहार ठप्प झाले.

सतत बरसून दमलेल्या पावसाने मध्यंतरी काही तासांची विश्रांती घेतली! यामुळे ताजेतवाने झालेल्या वरुण राजाच्या फोजेने मग पुन्हा अख्या जिल्ह्यावर आक्रमण केले. यातही घाटाखालील आक्रमण धडकी भरविणारे होते. काल पर्यंत  जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद असलेल्या जळगाव व संग्रामपूर तालुक्यात मेघराजा जास्तच बरसला.

जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव( 68.8 मिमी) , वडशिंगी( 90.3मिमी) , संग्रामपूर तालुक्यातील संग्रामपूर( 74.8 मिमी), पातुरडा ( 93मिमी) कवठळ( 90.5) ,शेगाव मधील मनसगाव( 88.30) आणि खामगाव मधील अटाळी( 79.8 मिमी) या महसुल  मंडळात अतिवृष्टी ची नोंद झाली. यामुळे या मंडळातील गावात पाणीच पाणी चोहीकडे असे चित्र आहे.