बुलडाणा येथील एल्गार मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा; रामा ट्रॅक्टर्सचे संचालक शिवदास राजपूत यांचे शेतकऱ्यांना आवाहन; म्हणाले , हीच ती वेळ..

 
pappu
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ६ नोव्हेंबरला बुलडाणा येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात सोयाबीन कापूस उत्पादक  शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा होणार आहे. या मोर्चाला सर्वच स्तरांतून पाठिंबा मिळत असून बुलडाणा जिल्ह्यातील अग्रगण्य युवा कृषी व्यावसायिक, जॉन डियर ट्रॅक्टरचे जिल्ह्यातील अधिकृत विक्रेते , रामा ट्रॅक्टर्स चिखलीचे संचालक शिवदास उर्फ पप्पुसेठ राजपूत यांनीही या मोर्चाला समर्थन दिले आहे.

 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभागी व्हावे. ही शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. अतिवृष्टीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन ,कापसाला भाव मिळालाच पाहिजे. शेतकरी भिक मागत नसून हा आमचा अधिकार आहे. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा धसका सरकारने घेतला पाहिजे. त्यासाठी राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. ६ नोव्हेंबरचा एल्गार मोर्चा हीच ती योग्य वेळ आहे. त्यामुळे या मोर्चाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवदास राजपूत यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात रामा ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांच्या सदैव सोबत आहेत असेही ते म्हणाले.