कोवळ्या वयात तिने सार काही भोगल.! खामगावच्या अल्पवयीन मुलीवर पुण्यात नेऊन बलात्कार! १९ वर्षांचा तरुण म्हणे लग्न करतो तुझ्याशी!

 
kraim
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव शहरातील बाळापूर फैल भागातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला पुण्यात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. स्वतः मुलीने खामगाव शहर पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात  तिच्यावर अत्याचार झाल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी खामगाव तालुक्यातील वरखेड येथील १९ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २० मे रोजी वरखेड येथील  सिद्धार्थ दिलीप वाघ याने १५ वर्षीय मुलीचे अपहरण केले होते. घटनेच्या दिवशी तो दिवसभर मुलीच्या घराभोवती घिरट्या घालत होता. त्यामुळे मुलीच्या आजीने सिद्धार्थ वाघ विरुद्ध अपहरणाची तक्रार दिली होती. खामगाव शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग इंगळे यांनी त्यांच्या पथकासह पुण्यातील पिंपरी चिंचवड भागातून आरोपी सिद्धार्थ वाघ याला अटक केली होती. त्याच्या तावडीतून मुलीची सुटका केल्यानंतर दोघांना काल खामगाव येथे आणण्यात आले. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दरम्यान पोलिसांसमोर दिलेल्या बयानात तिने सिद्धार्थने तिच्यावर जबरदस्ती बलात्कार केल्याचे सांगितले. मी तुझ्याशीच लग्न करील असे तो तिला म्हणाला होता. पोलिसांनी सिद्धार्थ वाघ याला न्यायालयासमोर हजर केले असता पोलीस कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली आहे.