आर्टिस्ट देवश्री ठाकूर बुलडाण्यात! म्हणाल्या, संधी जेव्हा कुंकू लावायला येते तेव्हा कपाळ धुवायला जावू नका

 
dthakur
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आयुष्यात आलेली कोणतीही संधी सोडू नका, संधीचे सोने केले पाहिजे. संधी जेव्हा माणसाला कुंकु लावायला येते तेव्हा माणसाने कपाळ धुवायला जावु नये.जर कपाळ धुवायला गेलो तर ती संधी कधीही परत आपल्या आयुष्यात येत नाही.  म्हणून जीवनात आलेली प्रत्येक संधी स्विकारण्याचे आवाहन मुंबईचे आर्टिस्ट देवश्री ठाकूर यांनी युवा महोत्सवात केले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा द्वारा आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन २जानेवारी  रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडले. त्यावेळी त्या बोलत होते.

 युवा महोत्सवाला अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बुलडाणा जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये लोकगीत व लोकनृत्य या बाबीचा समावेश १५ ते २९ या वयोगटामध्ये करण्यात आला होता.  लोकगीतमध्ये प्रथम क्रमांक जिजामाता महाविद्यालय, बुलडाणा येथील चमुने प्राप्त केला व  आयोजित होणाऱ्या अमरावती येथे विभागस्तर युवा महोत्सवासाठी पात्र ठरला.  दुसरा क्रमांक गुरुकुल ज्ञानपीठ, येथील चमुने प्राप्त केला. असे असले तरी राष्ट्रीय खेळाडू निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.