Big Breaking मृगाऐवजी कोरोनाचे आगमन! तब्बल सव्वा महिन्यानंतर आढळला रुग्ण !! प्रसाशनासह नागरिकांनी सावध राहण्याची गरज

 
korona
 बुलडाणा(विशेष प्रतिनिधी: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील लाखो शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहे. मात्र मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पाऊस तर आला नाही पण कुणालाच नको(च) असलेला कोरोना मात्र परतला आहे. आज दीर्घ कालावधीनंतर जिल्ह्यात एक रुग्ण आढळून आल्याने प्रशासन व नागरिकांनी देखील दक्ष राहण्याची गरज आहे. 

कोरोना उर्फ कोविड याचा जनक असलेल्या चीन मध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. या पाठोपाठ महाराष्ट्र राज्यातील मुंबई, ठाणे व पालघर मध्ये या कोविडने पुन्हा डोके  वर काढले यामुळे शासन चिंताग्रस्त झाले असून मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री  टास्क फोर्सच्या नियमित संपर्कात आहे . तूर्तास मास्क सक्ती टळली असली तरी आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहे. 

या पार्श्वभूमीवर आज ,७ जूनच्या अहवालात जिल्ह्यात ( बुलडाणा शहरात) १  रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रसाशन व आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्याचे दिसून आले. प्राप्त माहितीनुसार  तब्बल ४० दिवसानंतर पॉझिटिव्ह आढळून आला आहे . मागील २८ एप्रिलला गुम्मी( ता. बुलडाणा) येथे एक रुग्ण आढळला होता. २७  एप्रिलला चिखली नगरीतील शिवराज नगर, टिळक नगर व माळीपूरा मध्ये प्रत्येकी १ मिळून ३ रुग्ण आढळले होते. त्यानंतर कोरोनाचा जोर ओसरत गेल्याने  १ एप्रिल पासून जिल्हा निर्बधमुक्त करण्यात आला होता.