तुम्ही बांधकाम कामगार आहात? फसवणूक होण्यापासून वाचायचेय.. मग ही बातमी खास तुमच्यासाठी

 
yhjyh
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बांधकाम कामगार योजनेच्या नावाखाली अनेकांची खाजगी एजंट कडून फसवणूक होते. त्यामुळे कोणत्याही अमिषाला बळी न पडता बांधकाम कामगारांनी नोंदणी व नूतनीकरण करून घ्यावे. फसवणूक झाल्यास कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही. अतिरिक्त रक्कम मागणाऱ्या व्यक्तीविरुद्ध जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी आ.शी.राठोड यांनी केले आहे.

 बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व विविध योजनांच्या लाभाचे वाटप सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातून ऑनलाईन पद्धतीने होते. विशेष म्हणजे या कामासाठी कोणत्याही प्रतिनिधी, दलाल, एंजंट यांची नेमणूक करण्यात आली नसल्याचेही कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. कामगारांना अर्ज नोंदणीसाठी वार्षिक एक रुपये एवढेच शुल्क आकारण्यात येते,शिवाय त्याची रीतसर पावती कार्यालयाकडून देण्यात येते. या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क आकारण्यात येत नसल्याचे कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.