मिसाळवाडीत संपन्न झाली आगळी वेगळी मकर संक्रांती! कृषीसेवक मयुरी ठेंग यांचा पुढाकार

 
Ggji
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  नुकताच मकरसंक्रांतीचा सण साजरा झाला. दरम्यान चिखली तालुक्यातील मिसाळवाडी येथे कर्तव्यदक्ष कृषी सेवक मयुरी ठेंग यांच्या पुढाकारातून आगळ्या वेगळ्या पद्धतीने मकरसंक्रांती उत्सव साजरा झाला. कृषी विभागाच्या वतीने यंदाचे २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरा करण्यात येत आहे, त्यानिमित्ताने मिसाळवाडीत कार्यक्रम संपन्न झाला.
गावातील महिलांसाठी यावेळी पौष्टिक तृणधान्य पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील शेकडो महिलांनी स्पर्धेत उस्फुर्त सहभाग घेत विविध पदार्थ तयार केले होते. कृषी विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी स्पर्धेचे परीक्षण करून विजेत्यांना  पारितोषिके दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विनोद मिसाळ, प्रमुख उपस्थितीत उपसरपंच हनुमान मिसाळ पोलीस पाटील रवी मिसाळ ,ग्रामसेवक सौ. ताठे  उपस्थित होते. यावेळी कृषी सहाय्यक सौ. खेडेकर यांनी तृणधान्य पिकांची माहिती दिली. कृषी सहाय्यक सौ.गिरी व सौ. सवडतकर यांचीही यावेळी उपस्थिती होती. कृषी सेवक मयुरी ठेंग यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम यशस्वी झाला.