'व्हॉईस ऑफ मीडिया' च्या विदर्भ अध्यक्षपदी अनिल म्हस्के! हक्काचा माणूस झाला विदर्भाचा आवाज..!

 
kug

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणजे ‘व्हाईस ऑफ मीडिया’!  राज्यातील पत्रकार आणि पत्रकारीतेच्या हितासाठी  कार्यरत या संघटनेच्या विदर्भ अध्यक्षपदी दै. ‘पुण्य नगरी’चे अकोला आवृत्ती प्रमुख अनिल म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष तथा सकाळ चे संपादक संदीप काळे यांनी मुंबईस्थित संघटनेच्या कार्यालयात त्यांना नियुक्तीपत्र दिले.

काय आहे 'व्हाईस ऑफ मीडिया'..

महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणजे 'व्हाईस ऑफ मीडिया' आहे. ५० ज्येष्ठ संपादकांनी एकत्र येऊन पत्रकारीता आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी निर्माण केलेली ही संघटना आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील १७ राज्यांमध्ये ही संघटना कार्यरत आहे. कोरोनाच्या संकटाकाळात १३६ पत्रकारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हा 'व्हाईस ऑफ मीडिया'ने या मृत पावलेल्या १३६ पत्रकारांच्या १५० पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करुन त्यांना मोठा आधार देण्याचे काम केले.

पत्रकारांची कल्याणकारी संघटना म्हणून ही संघटना देशात कार्यरत असून केवळ पत्रकारीता आणि पत्रकारांना सक्षम करण्याचे काम  करीत आहे. पत्रकारांना त्यांची स्वत:ची घरे उपलब्ध करुन देणे,  पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, आजारपण, अपघात किंवा इतर सकटकाळी पत्रकारांना आधार देण्याचे कार्य ही संघटना करीत आहे.  ज्येष्ठ संपादक, पत्रकार या संघटनेमध्ये सहभागी असून मुंबईत संघटनेचे मुख्य कार्यालय आहे.

हक्काचा माणूस झाला विदर्भाचा 'आवाज'

अनिल म्हस्के गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारीतेत  कार्यरत आहेत.  अजूनही तितक्याच ताकदीने लिहिणारा आणि परखड  लिखान करणारा  पत्रकार म्हणून त्यांनी ओळख  निर्माण केली आहे.   पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली असून त्यांच्या कार्यकाळात सुसज्ज असे जिल्हा पत्रकार भवन पत्रकारांसाठी खुले झाले. सध्या जिल्हा पत्रकार भवन समितीचे ते अध्यक्ष आहेत. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात आणि ताुलक्यात  संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. जिल्हा व तालुकास्तरावर ११ सदस्यांची समिती गठीत करुन नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती दिली जाणार आहे. शहरी आणि ग्रामीण अशा सर्वच पत्रकारांना सहभागी करुन घेणार असल्याची माहिती नवनियुक्त विदर्भ अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी दिली आहे.