अंगणवाडी सेविकेचा मुलगा होणार एमबीबीएस डॉक्टर! बीबी च्या सुमित इंगळे ने "नीट" मध्ये नाव कमावलं

 
ghfh
 सिदखेडराजा( बाळासाहेब भोसले: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दुसरबीड येथे कार्यरत असलेले पोस्टमन मधुकरराव इंगळे यांचा मुलगा सुमित याने नीट परीक्षेमध्ये 720 पैकी 569 गुण घेऊन आपल्या आई-वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न तो साकार करणार आहे.  सुमितची आई ही उच्च शिक्षित एम कॉम असून देखील आर्थिक परिस्थितीमुळे अंगणवाडी सेविका म्हणून काम करत आपल्या दोन मुलांना शिक्षण देऊन सुमित ला डॉक्टर करण्याचे स्वप्न साकार करीत आहे.

आर्थिक परिस्थितीमुळे बाहेरगावी लातूर नांदेड औरंगाबाद अकोल्यासारख्या ठिकाणी जाऊन शिकवणी वर्ग करू शकत नाही म्हणून परिसरातीलच देऊळगाव राजा येथेच  शिकून तो आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करत आहे. सुमित आपल्या यशाचे श्रेय आई वडीलांना देतो. सुमितच्या यशाबद्दल रूम्हणा येथील शिक्षक उद्धव गवई यांनी बिबी येथे  घरी जाऊन आई सह सुमित इंगळेचा सत्कार केला.