भाऊंच्या सगळ्या स्कूल बस भारत जोडायला! पोरांना शाळेत न्यायला गाडी आलीच नाही; कॉलेजच्या पोरांना, मास्तरांना यात्रेत सहभागी होण्याच्या सुचना...!

 
gadi
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष " भाऊ " अध्यक्ष असलेल्या अनुराधा इंग्लिश स्कूल, कॉलेजच्या सगळ्याच बसेस कालपासून भारत जोडो यातेत्र व्यस्त आहेत. त्यामुळे मुलांना शाळेत न्यायला आज गाड्या आल्याचं नाहीत...अनुराधा इंग्लिश स्कूल मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांच्या पालकाने "बुलडाणा लाइव्ह" ला ही माहिती दिली.

याआधीही भाऊंच्या कॉलेज मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना काँग्रेसचे सदस्य करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. त्यात आता खा. राहुल गांधींच्या यात्रेसाठी शाळा, कॉलेजच्या बस लावण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे "वर्किंग डे " असताना शाळा, कॉलेजच्या अनेक शिक्षकांना, कॉलेज तरुणांना सुद्धा भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे आदेश दिल्याचे कळते. त्यामुळे "त्या" शिकणाऱ्या  चिमुकल्यांना नाईलाजाने का होईना आज शाळेत न जाता घरी थांबावे लागले आहे.