अरेच्चा...!खोकल्याचे औषध समजून विषारी द्रव्य केले प्राशन! देऊळगाव राजा येथील घटना

 
yuhf
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  खोकल्याचे औषध समजून एका ३२ वर्षीय व्यक्तीने विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना देऊळगाव राजा येथे समोर आली आहे. विष प्राशनामुळे हृदयाची गती कमी होऊन बेशुद्ध अवस्थेत असताना, डॉक्टरांनी कृत्रिम श्वास दिल्याने, त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. कृष्णा अहिर (३२) रा. देऊळगाव राजा असे या रुग्णाचे नाव आहे.

         ghube

                         (जाहिरात👆)

सर्दी, ताप, खोकला अशा आजारांची औषधे प्रत्येकांच्याच घरी असतात.कृष्णा अहिर यांच्या घरी देखील खोकल्याची औषध होती. त्यांना खोकल्याचा त्रास होत असल्याने त्यांनी खोकल्याचे औषध समजून, विषारी द्रव्याची बॉटल उघडून ते विषारी द्रव्य प्राशन केले. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. प्रकृती बिघडत चालल्याचे पाहून नातेवाईकांनी त्यांना देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले.

दरम्यान विष प्राशना मुळे कृष्णा अहिर यांच्या हृदयाची गती हळूहळू कमी होऊ लागली. परिणामी ते बेशुद्ध पडले. दरम्यान डॉ. अक्षय गुठे यांनी कृत्रिम श्वास दिला. डॉ. पूजा डोंगरे, परिचारिका काळुसे,मोरे, सुभाष कणखर या कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी पुढाकार घेतला. रुग्णाची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी त्यांना जालना जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.