कोराडी पाठोपाठ उतावळीही तुडुंब ! पेन टाकळी मधील जलसाठ्यात वाढ!! नदीकाठच्या गावांना केले अलर्ट...!

 
ggjhfj
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कोराडी पाठोपाठ आता उतावली मध्यम प्रकल्प देखील 100 टक्के भरला! याशिवाय पेन टाकळी धरणातील जलसाठा देखील वाढला आहे. यामुळे या धरण क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

यंदाच्या पावसाळ्यात 100 भरणारा पहिला  प्रकल्प कोराडी हा ठरला. यापाठोपाठ उतावली धरण ओव्हरफ्लो  झाले आहे. सध्या धरणातून 1 सेंमी/ .72 क्यूसेक इतका विसर्ग वाहत आहे. धरणात 370  दलघमी इतका जलसाठा आहे. पेनटाकळी धरणात 70 टक्के जलसाठा असून यापेक्षा जास्त साठा झाल्यास वक्रद्वारातुन पाणी सोडण्यात येणार आहे. मन मध्येही 80 टक्के ,ज्ञानगंगा मध्ये 72 टक्के जलसाठा आहे. यातुलनेत खडक पूर्णा 32टक्के  ,तोरणा मध्यम प्रकल्पात 32, नलगंगा 46 टक्के या धरणातील जलसाठा अजूनही अपुरा आहे.