लम्पीनंतर आता तोंडखुरी,पायखुरी? जिल्ह्यात ४,७९,००० गूरांना २१ जानेवारी पर्यंत लसीकरण

 
lampi
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लम्पी या चर्मरोगाने जिल्हा पशुसंवर्धन विभाग दक्ष झालाय. ही परिस्थिती आटोक्यात आणली असून, आता तोंडखुरी व पायखुरी या आजाराच्या गुरांना लसीकरण केल्या जात आहे. जिल्ह्यात जवळपास ४,७९,००० जनावरांना २१ जानेवारी पूर्वी लसीकरण केले जाणार आहे.

 लम्पीच्या सावटामध्ये पाळीव जनावरांना तोंडखुरी व पायखुरी आजाराची लागण होऊ नये म्हणून लसीकरण करण्यात येत आहे. आधीच पशुपालकांना कमालीची चिंता भेडसावत आहे. शासकीय पशुवैद्यकय रुग्णालयामार्फत लसीकरण सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु या लसीकरणाच्या मोहिमेला गती देण्याची गरज आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुध-दुभते जनावरे आहेत.

बैलांसह इतर पाळीव जनावरांची संख्या मोठी आहे. काही ठिकाणी या जनावरांना तोंडखुरी व पायखुरीची लागण झाली आहे. यामुळे जनावरांना चारा चघळता येत नाही तथा पायखुरीमुळे चालता येत नाही. जनावरांच्या तोंडातून केवळ लाळ टपकत आहे. तोंड लालसर झाले असून तोंडात व्रण पडले आहे. जनावरे चारा खात नसल्याने अशक्त झाले आहेत. पायखुरीमुळे त्यांना चालायला त्रास होत आहे. सध्या तोंडखुरी व पायखुरी या आजाराच्या गुरांना लसीकरण केल्या जात आहे.आजारामुळे पशुधन संकटात सापडले आहे. जनावरांच्या औषधोपचाराकरिता शेतकऱ्यांजवळ पैसा नाही. दरम्यान जिल्हा पशुसंवर्धन विभाग आता दक्ष झाला असून, सध्या तोंडखुरी व पायखुरी या आजाराच्या गुरांना लसीकरण केल्या जात आहे. पशुपालकांनी गुरांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.