अबब! ८० फूट खोल विहिरीत उतरून कोब्राला दिले जीवदान !! नागपंचमीला केले अजब धाडस

 
hjv,kj
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ८० फूट खोल विहिरीत  दोराला लटकत कोब्रा सारख्या विषारी सापाला जीवदान देणे म्हणजे धाडसाची कमालच! ही अजब गजब कामगिरी करण्याची करामत केली नांदुरा   येथील सर्पमित्र  मोहन बासोडे यांनी! 

नांदुरा शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर   खुमगाव बुट्टी येथील किशोर काळे यांना, त्यांच्या शेतातील विहिरीत  साप दिसला.  त्यांनी सर्पमित्र मोहन बासोडे यांच्याशी संपर्क केला. तिथे पोहचल्यावर  विहीर ८० फुट खोल असल्याचे समजल्यावर काही क्षण थक्क झालेल्या बासोडे यांनी नव्याने योजना करून व कमालीचे धाडस दाखविले! दोरीने खाली लटकत त्यांनी विषारी  नागाला  अलगद पणे पकडून बरणी बंद केले.

दरम्यान ही माहिती  देणारे सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी,   ऐवढ्या खोलवर आणि तेही दोरावर लटकत असल काम करायला जिगर लागते असे सांगितले.  ते आमच्या सर्पमित्राने करून दाखविले याचा अभिमान असल्याचे बुलडाणा लाइव्ह सोबत बोलताना सांगितले