अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने टेम्पोला उडवले!; एक जण जागीच ठार; लोणार जवळील घटना

 
45365
लोणार ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):-  अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर ने टेम्पोला उडवले. या अपघातात टेम्पोचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. काल, २६ एप्रिलच्या रात्री ११ च्या सुमारास लोणार तालुक्यातील अजीसपूर गावाजवळ बुलडाणा - जालना जिल्ह्याच्या  सीमेवर हा अपघात झाला.
  सचिन विष्णू खंदारे (२२, रा.कानडी, ता. मंठा , जि. जालना) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. सचिन टेम्पो घेऊन लोणारकडून तळणी ( ता. मंठा) कडे जात होता. रात्री ११ वाजता लोणारकडे रेती घेऊन येणाऱ्या टिप्पर ( क्रमांक एम. एच २१, बी.१७२४) ने टेम्पो ला धडक दिली. या अपघातात टेम्पोचालक  सचिन खंदारे याचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर टिप्पर चालक टिप्पर जागेवर सोडून पसार झाला.