छत्रपती संभाजीनगर येथे होणार राजपूत समाजाचा महामेळावा! नियोजनासाठी जिल्ह्यातील राजपूत समाज बांधवांची आज चिखलीत बैठक!

 
rana
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्यातील सकल राजपूत समाजाचा महामेळावा मार्च महिन्यात छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. या मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रातील राजपूत समाज बांधव उपस्थित राहणार असून प्रत्येक जिल्ह्यात या मेळाव्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. दरम्यान या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज, २५ डिसेंबर रोजी चिखलीत जिल्ह्यातील राजपूत समाज बांधवांनी बैठक होणार आहे. चिखली एमआयडीसीत असलेल्या श्री .पप्पू सेठ राजपूत यांच्या लॉन मध्ये ही सकाळी ११ वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे.

 छत्रपती संभाजी नगर येथे होणारा महामेळावा प्रचंड मोठा व न भूतो न भविष्यती असा होणार आहे. या मेळाव्यात प्रत्येक समाज बांधवांचे योगदान असणे गरजेचे आहे. त्यामुळेच बुलडाणा जिल्ह्यातील राजपूत समाजबांधवांनी मेळाव्याच्या पूर्वनियोजनसाठी होत असलेल्या या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.