शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुटी जाहीर करावी. शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांची मागणी

 
utkyuyuk
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव महाराष्ट्र सरकारच्यावतीने महापुरुषांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आले आहे. त्यामुळे २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे त्या निमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात  आली आहे. यासंदर्भाचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या शिष्टमंडळाने त्यांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांना दिले.

  बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शासकीय निमशासकीय व सर्व स्तरावर शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी निवेनाद्वारे करण्यात आली.
यावेळी उपजिल्हा प्रमुख संजय हाडे, विधानसभा संघटक अशोक इंगळे, शहर प्रमुख हेमंत खेडेकर, युवासेना तालुका प्रमुख निलेश राठोड, शहर प्रमुख सचिन परांडे, यु से उप तालुका प्रमुख मोहन निमरोट, रामेश्वर शिंदे, रणजित राजपूत, नारायण यंगड यांची उपस्थिती होती.